राज्यातील पाच जिल्हा परिषदांसाठी ७जानेवारीला मतदान

राज्यातील पाच जिल्हा परिषदांसाठी ७जानेवारीला मतदान मुबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०१९ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल.